Tiranga Times Maharashtra
महादेव ऑनलाइन बुक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 21.45 कोटींची मालमत्ता जप्त
महादेव ऑनलाइन बुक (MOB) या बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. PMLA कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या तपासात ED च्या रायपूर झोनल कार्यालयाने 21.45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
या कारवाईत 98.55 लाख रुपयांची रोकड तसेच एकूण 27 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये घरे, दुकाने, कृषी जमीन आणि आलिशान अपार्टमेंट्स यांचा समावेश असून, ही मालमत्ता भारत आणि दुबई येथे असल्याचे सांगण्यात आले आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची अंदाजे किंमत 20.46 कोटी रुपये आहे.
